|| श्री ||
माझे श्री गजानन
गजानन माझी माऊली
प्रेमाची सावली ||धृ||
गुरु माझा गजानन
फिरला जरी अनेक कानन ||
भक्तांसाठी धावतो
एका हाकेत पोहचतो ||
परीक्षा जरी पाहतो
भक्तांना दूर ना जाऊ देतो ||
गजानन माझा सखा
आहे माझा पाठीराखा ||
गजनानाची आवड पिठलं आणि भाकर
भक्तांना वाटतो पेढे आणि साखर ||
गजानन माझा कारक
गजानन माझा तारक ||
-मिनल
श. सालफळे जोशी
(कविता ऐकण्याकरिता खालील ऑडिओ सुरू करा.
To listen play audio below.)
8
Recent comments